Thursday, 17 January 2019

स्वबळावर लढायचं आणि जिंकायचं आदित्य ठाकरेंचं आवाहन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला.

यापुढे स्वबळावर लढायचं, जिंकायचं आणि एकहाती सत्ता आणायची, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं.

आदित्य ठाकरे

 • स्वबळाचा ठराव आपण मंजूर केलाय 
 • आता आपण ठरवलंय स्वबळावर लढायचं आणि जिंकायचं 
 • सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोण करत नाही 
 • शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करते 
 • हाडामांसाचे शिवसैनिक आपल्या पक्षात आहे कार्यकर्ते यांचा रोल महत्वाचा आहे
 • साहेबांचं एक वाक्य होतं ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण पण आपण आता १५० टक्के समाजकारण आणि तितकेच टक्के राजकारण करतोय 
 • आपण जे कार्य करतोय त्या जनसेवेला मी सलाम करतोय
 • आजचा दिवस अभिमानाचा आहे 
 • आपण कुठे होतो अाणि कुठे आलो आहोत ते आपल्याला माहित आहेत 
 • ५२ वर्षांत काय झगडावं लागलं आहे हे आपल्याला माहित आहे 
 • आपण कोणाच्या जीवावर मोठे झालो नाहीय 
 • राष्ट्सेवा, राष्टप्रेम हे एकच हित आपलं आहे 
loading...

Top 10 News

राशी भविष्य