Sunday, 18 November 2018

जगभरात ईदचा उत्साह, सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईद. ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘ चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

आज जगभरात सर्व मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह पहायला मिळत आहे. ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये लगबग पाहायला मिळाली.

चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधव सज्ज झाले. बाजारात लोकांची गर्दी वाढली. तसेच महाराष्ट्रसह देशभरात सर्व मुस्लिम बांधव एकत्रितपणे ईद हा सण साजरा करत आहेत. 

दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम, इमाम बुखारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी भारतात ईद शनिवारी साजरी केली जाईल, अशी घोषणा केल्यानंतर सर्वांमध्ये ईदचा उत्साह पहायला मिळाला. 

मुंबईत सर्वच मशिदीत नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.

तसचं यादिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात. घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात.

राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सर्व मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. "समाजातील एकता आणि एकोपा टिकून राहो, अशी  प्रार्थना करतो," असं मोदींनी संदेशात म्हटलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य