Thursday, 17 January 2019

दलित मुलांना मारहाण केल्याप्रकरणी राहुल गांधींची अप्रत्यक्ष टीका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जळगावातील जामनेरमध्ये विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील दोन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेचा सगळीकडून तीव्र विरोध होत आहे. या घटनेवर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही विरोध दर्शवला आहे.

या संतापजनक घटनेसाठी राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसच्या मनुवादी विचारांना दोषी ठरवलं आहे. याविरोधात आज आवाज उठवला नाही, तर इतिहास माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी ट्विटवर त्या प्रकारणाचा व्हिडीओ शेअर करुन भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?
जळगावात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात राहणारी मातंग समाजाची मुलं भटका जोशी समाजातील आरोपीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. हा प्रकार समजताच आरोपींनी तिघांना नग्न करुन अमानुष मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांची गावात धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण केली.

ही घटना रविवारी दहा जून रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.

या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.

आरोपींवर मारहाण करणे आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे यासाठी आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य