Sunday, 20 January 2019

राज ठाकरे यांची आज हाफ सेंच्युरी पूर्ण...

Previous Next

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपल्या रोखठोक भाषणाने महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 50 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित व त्याची भावी पत्नी मिताली हे घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला.

राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. राज ठाकरेंचा वाढदिवस मनसैनिकांनीही जल्लोषात साजरा केला आहे.

राज ठाकरे आजच्या घडीला राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे.

मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रं काढली.

आजही राज ठाकरे यांची नियमित व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असून नेहमीच ती चर्चेचा विषय ठरतात.

राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळालं. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.

2006 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. 2008 मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर त्यांना राज्यातून मोठया प्रमाणावर मराठी लोकांचं समर्थन मिळालं. 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तेरा आमदार निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत राज ठाकरेंच्या ममसेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणूकीत मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला.

मनसे कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला राज ठाकरेंचा वाढदिवस...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य