Friday, 18 January 2019

स्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरण खटल्यातले आरोप बेबुनियाद - राहुल गांधी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

या खटल्याप्रकरणी आज भिवंडी कोर्टात सुनावणी पार पडली आहे. राहुल गांधी कोर्टात उपस्थित राहिल्यानंतर कारवाई सुरुवात झाली. त्यावेळी राहुल गांधींनी आपल्यावरील आरोप फेटाळले आणि खटल्यासाठी तयार आहे, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून खटला पुढे चालवला जाईल. या प्रकरणाबाबतची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.

राहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार

loading...

Top 10 News

राशी भविष्य