Sunday, 20 January 2019

युती सरकारवर पुन्हा एकदा राज यांचा व्यंगचित्रातून निशाणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सोशल मिडीयामार्फत युती सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी व्यंगचित्रामध्ये भाजपा आध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यंग काढले, त्यामध्ये ते एकमेकांची गळाभेट करतात व  पाठीच्या खंजीर खुपसतात त्यांनी व्यंग काढले आहे. 

भाजपा अध्यक्ष अमित शहांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतलेल्याभेटीनंतर शिवसेना आणि भाजपा पुढील लोकसभा निवडणुकीत एकत्र लढणार, अशी शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत असताना शिवसेनेचे नेते मात्र स्वबळावर ठाम आहेत. 

राज ठाकरेंनी 'भेट आणि मन की बात' अशा शीर्षकाखाली एक व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गळाभेट घेताना दिसत आहेत. या दोघांनी आपापला एक हात एकमेकांच्या पाठीवर ठेवला आहे. तर दोघांच्या दुसऱ्या हातात खंजीर आहे. हा खंजीर ते एकमेकांच्या पाठीत खुपसण्याच्या तयारीत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवलं आहे.

राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, सत्तेतून बाहेर पडू, अशी धमकी वारंवार देणाऱ्या उद्धव यांची राज यांनी या व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात उद्धव यांच्या खिशात राजीनामे दाखवण्यात आले आहेत. 
 

 

राज ठाकरेंनी रेखाटली अमित शहांची बकेट लिस्ट व्यंगचित्राद्वारे...
पाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र...
राज ठाकरेंच नव व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य