Wednesday, 16 January 2019

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, भेटीगाठींना सुरुवात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.  

भाजपाच्या समर्थन वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकसंपर्क अभियानांतर्गत अंतर्गत ते आज मुंबईमध्ये येणार असून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मोतोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. ही भेट राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाची मानली जात आहे.

लोकसंपर्क अभियानांतर्गत अंतर्गत त्यांनी आज अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे देखिल उपस्थीत होतेत. 

या भेटीमागे, राज्यसभेची रिकामी होणारी जागा आणि आगामी निवडणुकांमध्ये माधुरीचा सहभाग असण्याची शक्यता हि कारणं असल्याची माहिती सुत्रांकडुन समजतेय. 

लता मंगेशकर  यांची तब्येत खालवल्यामुळे आमित शहा आणि लता मंगेशकर यांची भेट रद्द  करण्यात आली आहे.
 
आता अमित शहा  रतन टाटा यांची भेट घेण्यास रवाना झाले आहेत.

दरम्यान आजच्या दौऱ्यातील शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सध्या अनेक जणांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये सेनाही राज्यात सत्तेत असताना देखील भाजपबरोबर त्यांचे वारंवार खटके उडालेले आहेत. त्यात पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून झालेल्या पराभवामुळे सेना सध्या प्रचंड दुखावलेली आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपबरोबर युती न करण्याची घोषणादेखील ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे शाह-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाह हे आज भाजपच्या आगामी रणनीतीविषयी भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पाठींबा देण्याविषयी ते चर्चा करणार आहेत.
 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य