Tuesday, 20 November 2018

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी वादात....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी वादात सापडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुस्लीम शाखेतर्फे या इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आलं होत. मात्र, मुंबईतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदविला आहे.

कुठेतरी भाजप मुस्लीम वोट बँकावर घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना राष्ट्रीय मुस्लीम मंचाद्वारे सरकारी यंत्रणाचा गैर वापर करीत आहे.  शकील अहमद शेख आणि अड्वोकॅट आदिल खत्री यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल शश्री, चे. विध्यासार राव आणि मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून ४ जून सोमवारी रोजी मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर आयोजनासाठी परवनगी देणारे अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी केली आहे. 

सह्याद्री अतिथीगृह ही शासनाची मालमत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देता येत नाही. या वास्तूचा वापर केवळ शासकीय कार्यक्रमांसाठीच होणे अपेक्षित असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार आणि रा.स्व.संघ यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य