Thursday, 17 January 2019

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच भाजीपाला महागला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांनी  1 जूनपासून 10 दिवस संप पुकारला आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे.  संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह 50 टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता.

या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झालेली नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 

या संपादरम्यान 1 जूनपासून भाजीपाला, दूधासारख्या वस्तूंचा पुरवठा खंडित केल्याने भाजीपाला महागला आहे. 

या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता या संपानंतर तरी सरकार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना मान्यता देणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.

राज्यात शेतकरी पुन्हा संपावर जाणार...

loading...

Top 10 News

राशी भविष्य