Sunday, 18 November 2018

अरबाज फसला मॅच फिक्संगमध्ये, पोलिसांनी पाठवले समन्स

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानला ठाणे पोलिसांनी IPL मध्ये बेटिंग केल्याप्रकरणी समन्स पाठवले आहे. सट्टेबाज सोनू जालनशी अरबाजचे संबंध असल्याचे पोलिसांनी याप्रकरणी सांगितले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी ठाणे पोलिसांनी अरबाजला तत्काळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अरबाजला शनिवारी म्हणजेच उद्या हजर राहावे लागणार आहे.

२०१२ साली जेव्हा सट्टेबाजीबाबत कारवाई करण्यात आली होती, तेव्हा देशातील सट्टेबाजारात प्रसिद्ध असलेला सोनू जालान उर्फ सोनू मालाडलाही पोलिसांनी पकडले होते. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली होती. त्याच्या अटकेनंतर त्याच्याकडील चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे व माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अरबाजने सोनू या सट्टेबाजाला पैसे देत मोठा डाव खेळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनू जलानची सट्टे बाजारातील उलाढाल पाच हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती त्याने चौकशीदरम्यान दिली.

2012 मध्ये एक आंतरराष्ट्रीय सामना फिक्स करण्यासाठी श्रीलंकेच्या एका क्रिकेटपटूला दहा कोटी रूपये दिल्याची कबुली त्याने मुंबई क्राईम बॅंचला दिली होती. तसेच आपली अटक टाळण्यासाठी त्याने एका IPS अधिका-याला 1 कोटी रूपयाची लाच दिली होती. तसेच एका IPS अधिका-याला तो मुली पुरविण्याचेही काम करत असल्याची माहिती समोर आली होती. पत्नी शागुफ्ता खान हिच्या हत्येप्रकरणी सोनूला संशयित म्हणून पाहिले जाते.

कोण आहे हा सोनू जलान ?

  • हा मुंबईतील सट्टा बाजारातील मोठा व प्रसिद्ध बुकी म्हणून ओळखला जातो.
  • कांदिवलीतील वास्तव्यास असलेल्या जलानला मुंबई पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीच्या संबंधात त्याला अनेक वेळा अटक झाली आहे.
  • सोनूचे पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबियासह अफगाणिस्तानात त्याचे ग्राहक आहेत.
  • सोबतच भारतात मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, हरयाणा व राजस्थानात त्याचे साथीदार आहेत.
loading...

Top 10 News

राशी भविष्य