Wednesday, 21 November 2018

वेतनवाढीच्या मागणीसाठी संप.... आज, उद्या बँका बंद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशभरातील 10 लाखांहून जास्त बँक कर्मचारी आजपासून म्हणजेच बुधवारपासून 2 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे राज्यभरातील ५५०० शाखांमधील कामकाज बंद असेल.

हे सर्व इंडियन बंक असोसिएशन (आयबीए) कडून वेतनात फक्त 2% वाढीला विरोध करत आहेत. तथापि, 5 मे रोजी या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत आयबीएने हा प्रस्ताव दिला होता. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेतनात 2% वाढीला काहीही अर्थ नाही. 30 आणि 31 मेच्या संपामुळे या महिन्याच्या पगारांवर परिणाम होऊ शकतो. एटीएम ट्रान्झॅक्शनही प्रभावित होऊ शकतात.संपादरम्यान नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आदी सेवा सुरू राहतील. पण प्रत्यक्ष बँकांमधील कामकाज बंद असेल.

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

 • वेतन निश्चितीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जावी.
 • सर्व ग्रेडच्या अधिकाऱ्यांचा समावेश 
 • इतर सेवाशर्थींमध्ये सुधारणा
 • वेतन-भत्त्यांमध्ये योग्य वाढ 

या मागण्यांवरून युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि आयबीएदरम्यान 2 मे 2017 पासून 12 नोव्हेंबर 2017 दरम्यान 13 बैठका झाल्या होत्या. नुकतीच 5 मे रोजी या मुद्द्यावर शेवटची चर्चा झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून पेंडिंग आहे.

कोणकोणत्या बँकांमध्ये संप?

 • स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)
 • पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)
 • बँक ऑफ बडोदा
 • इलाहाबाद बँक
 • युनियन बँक
 • युको बँक सहित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व बँकांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संपामध्ये समावेश आहे.
 • मिळालेल्या माहितीनुसार, काही एटीएमचे सुरक्षा रक्षकदेखील संपामध्ये सहभागी होणार आहेत.  

सलग चौथ्यांदा व्याजदर जैसे थे

loading...

Top 10 News

राशी भविष्य