Sunday, 18 November 2018

#RoyalWedding: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नासाठी मुंबईच्या या मुलीला आमंत्रण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सर्वत्र सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाचीही चर्चा असून त्यांच्या शाही लग्नाची जगभरात उत्सुकता आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी एकूण 7 चॅरिटी संस्थांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. त्यात  सुहानी जलोटाच्या मैना महिला फाऊंडेशनचा समावेश आहे.

मैना महिला फाऊंडेशन ही या यादीतली एकमेव परदेशी संस्था आहे. इतर 6 चॅरिटी संस्था यूकेमधल्याच आहेत. 

लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी कोणत्याही भेटवस्तू न आणता या संस्थांना डोनेशन द्यावं, असं आवाहन जोडप्यानं केलं आहे.

सुहानी जलोटा -

  • तीन वर्षांपूर्वी सुहानी जलोटा आणि मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या काही महिलांनी स्थापना केली.
  • भारताच्या आर्थिक राजधानीत राहणाऱ्या
  • सुहानी जलोटा वयाच्या 23व्या वर्षी हे फाऊंडेशन आणलं
  • महिलांमध्ये मासिक पाळीसंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करते.
  • सुहानी यांच्या कामानं हजारो महिलांना सशक्त केलं
  • मुंबईतल्या गोवंडीमधल्या झोपडपट्टीच्या भागात मैना महिला फाऊंडेशनचं कार्यालय
  • मैना पॅड पहिल्यांदा जुलै 2015मध्ये तयार झाले
  • मे 2016पर्यंत मुंबईच्या झोपडपट्टीतल्या 1500 महिलांपर्यंत पोहोचले

सुहानी यांच्यासोबत त्यांच्या संस्थेतल्या काही सहकारी या शाही विवाह सोहळ्यासाठी यूकेला जाणार आहेत. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्यासाठी त्या एक भेटवस्तू देखील घेऊन जात आहेत. मैना पक्षाचं एक कट आऊट त्यांनी तयार केलंय. त्यावर फाऊंडेशनच्या स्टाफने संदेश लिहिले आहेत. ही भेट शाही परिवाराच्या नक्की आठवणीत राहील अशी त्यांना अपेक्षा आहे.

meghan-markle-menstruation-stigma-866x487.jpg

#RoyalWedding: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य