Sunday, 20 January 2019

बोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटक विधानसभेच्या सभापतीपदी आपले विराजपेठ येथील आमदार के.जी. बोपय्या यांना बसवलं आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून हा राज्यघटनेचा अवमान आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.याविरोधात काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती.

आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. काँग्रेसकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली. हंगामी अध्यक्ष बदलण्याचे आदेश आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. तसंच कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी होऊ द्या. याच थेट प्रक्षेपण करा, यामुळे पारदर्शकता येईल असा दिलासाही कोर्टाने काँग्रेसला दिला.

कोण आहेत के. जी. बोपय्या ? 

 • के. जी. बोपय्या यांचं पूर्ण नाव 'कोंबारना गणपती बोपय्या'
 • बोपय्या कोडागू जिल्ह्यातल्या विराजपेट मतदारसंघातून 3 वेळा आमदार
 • 2004 मध्ये पहिल्यांदा निवडून आले
 • येडियुरप्पा सरकारमध्ये 2009 ते 2013 पर्यंत विधानसभेच्या अध्यक्षपदी
 • येडियुरप्पाविरोधी बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठरला वादग्रस्त
 • बोपय्यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडून ताशेरे
 • 2009 च्या निवडणुकीनंतर बोपय्या हंगामी सभापती
 • हंगामी सभापती बोपय्यांच्या काळातच भाजपची सत्ता स्थापन
 • सरकार स्थापनेनंतर बोपय्यांनाच सभापतीपदाची माळ
 • बोपय्या लहानपणापासून संघाच्या मुशीत वाढले
 • कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य
 • आणीबाणीच्या काळात बोपय्यांनी भोगला तुरुंगवास
 • येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख

बोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य