Thursday, 17 January 2019

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटकमध्ये शनिवारी म्हणजेच उद्या सायंकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने भाजपला आदेश दिले आहेत. कर्नाटकातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात दोन्ही बाजूंनी बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्यावर जोरदार युक्तीवाद केला मात्र कोर्टाने उद्याच दुपारी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश येडियुरप्पांना दिल्याने भाजपाला मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे येडियुरप्पा उद्या बहुमत सिद्ध करणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सिक्री, अशोक भूषण आणि बोबडे यांच्या खंडपीठाने आज हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाला भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी विरोध केला. 'आमच्याकडे पुरेसा वेळ नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी कमीत कमी एका आठवड्याची वेळ देण्यात यावी,' अशी मागणी रोहतगी यांनी केली होती मात्र आमच्याकडे बहुमताची यादी असल्याचंही सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्ट केलं .

 • कर्नाटक प्रकरणातीला याचिकेवर सर्वाच्च न्यायालयात सुनावणी 
 • काॅग्रेस जेडीएसच्या याचिकेवर सुनावणी 
 • जेष्ठ वकील शांतीभूषण कोर्टात उपस्थित
 • येडियुरप्पांना राज्यपालांनी दिलेली पत्रे पाठवली 
 • मकूल रोहतगीकडून कोर्टाला पत्रे सादर 
 • जनतेचा कौल हा बदलासाठी दिलेला कौल 
 • पाठिंबा देणा-याची नावे सांगण्याची गरज नाही
 • मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद
 • काँग्रेस जेडीएसच्या दोन आमदारांचा पाठिंबा
 • कार्टात दिलेल्या पत्रात आमदारांच्या नावापुढे सह्या नाहीत 
 • आमदारांनी सह्या करण्याची गरज नाही - रोहतगी
 • येडियुरप्पानी आमदारांची यादी सादर केली
 • आमच्याकडे बहुमत आहेच. त्याशिवाय आम्ही सरकार स्थापनेचा दावा केलाच नसता : सदानंद गौडा, भाजपचे नेते
 • संधी कोणालाही मिळो बहुमत सभागृहातच सिध्द होईल
 • शनिवारी बहुमत सिध्द व्हायला हवे -सर्वाच्च न्यायालय
 • कर्नाटकात आकड्यांचा खेळ आहे-सर्वाच्च न्यायालय
 • आम्हाला निमंत्रण द्या आम्ही उद्या बहुमत सिध्द करु- अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेसचे वकील
 • उद्या चार वाजता बहुमत सिध्द करा -सर्वाच्च न्यायालय
 • शनिवारी बहुमत सिध्द कर - सर्वाच्च न्यायालय
 • बहुमत सिध्द होईपर्यंत आमदारांना सुरक्षा द्या -सर्वाच्च न्यायालय
 • राज्यपालांनी कुमारस्वामीना का आमंत्रित केलं नाही - सिंबल 
 • सभागृहात व्हिडीओ शुटींग करा - सिंघवी
 • अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती नको -सर्वाच्च न्यायालय
 • येडियुरप्पा धोरणात्मक निर्णय घेणार नाहीत - रोहतगी
 • येडियुरप्पाना कोणतेच आदेश देवू नका - रोहतगी 
 • हंगामी अध्यक्ष सभागृहातच निवडला जाईल -सर्वाच्च न्यायालय
 • पोलिस महासंचालकांना आदेश सर्व परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे -सर्वाच्च न्यायालय
 • कर्नाटकात उद्या होणार बहुमत चाचणी 

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

कर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live

काँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा

loading...

Top 10 News

राशी भविष्य