Tuesday, 22 January 2019

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने गाठला उच्चांक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी रविवारपासून उच्चांक गाठला आहे. आर्थिक वर्षाची सुरुवात महागाईने झाली त्यामुळे वाहतूकदार संतप्त आहे. आता पेट्रोलसाठी प्रति लीटर 81.59 रु. आणि डिझेलसाठी 68.70 रु. इतकी रक्कम मोजावी लागणार आहे.

इंधनाचे दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार ठरतात. रविवार 1 एप्रिलपासून पेट्रोलचे दर 81.59 रु. आणि डिझेलचे दर 68.70 रु झाल्याने याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. इतर घटकांप्रमाणेच इंधनाचे दर जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केलेली नाही. जीएसटी अंतर्गत इंधनाचा समावेश झाल्यास या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकेल.

पेट्रोलच्या किंमती वाढल्याने शहरातील लाखो दुचाकीस्वारांच्या इंधनखर्चात वाढ होणार आहे. ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहे

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य