Thursday, 17 January 2019

नालासोपाऱ्यात अपहरण; चिमुकलीचा मृतदेह सापडला गुजरातमध्ये

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नालासोपारामधल्या चिमुकलीचा मृतदेह गुजरातच्या नवसारीत आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. दोन दिवसांपूर्वी या चिमुकलीचा नालासोपारातील विजयनगर परिसरातून अपहरण करण्यात आले होते. आता या चिमुरडीचा मृतदेह गुजरातच्या नवासरीत सापडल्याने एकच खळबळ उडालीय. दरम्यान, या अपहरणाची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीत.

एका अज्ञात महिलेने 6 वर्षीय अंजलीचं अपहरण केले असल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमधून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय. तर, तुळींज पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अंजलीचा जीव गमवावा लागला असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य