Thursday, 17 January 2019

‘न्यायालयाचा निर्णय अॅट्रॉसिटीचे दात काढणारा’: प्रकाश आंबेडकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अॅट्रॉसिटीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केलीय. पत्रकार परिषद घेत या निकालावर आंबेडकर यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :

  1. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अनेक केसेस कोर्टापर्यंत पोहचणार नाहीत, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.
  2. न्यायव्यवस्थेचाच एकमेकांवर विश्वास नसल्याचे या निर्णयातून दिसत आहे.
  3. सुप्रीम कोर्टाने कायद्याला वेसन घालण्याचे काम करू नये.
  4. या निर्णयातून सुप्रीम कोर्टाने एक नवीनच व्यवस्था तयार केली असून ती संभ्रम निर्माण करणारी आहे.

एकीकडे कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत असतानाच आंबेडकर यांनी, ‘सरकारने हा निर्णय लार्जर बेंचकडे घेऊन जावा,’ अशी मागणीही केली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना थेट अटक न करता प्राथमिक चौकशीनंतरच अटकेची कारवाई केली जावी, असा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य