Wednesday, 16 January 2019

‘पुन्हा असे प्रकार होणार नाही’ फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्गचे युजर्सना आश्वासन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणी फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकेरबर्गनं अखेर मौन सोडलंय.आमच्या हातून काही चुका झाल्या आहेत. पण त्या सुधारण्यासाठी आम्ही उपाययोजना देखील राबवल्या आहेत, असं झुकेरबर्गनं म्हटलंय. पुन्हा असे प्रकार होणार नाही, असं आश्वासनंही त्याने युजर्सना दिलंय.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला फेसबुकवरील 5 कोटी युजर्सचा तपशील दिल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी झुकेरबर्गला ब्रिटनच्या संसदीय समितीने समन्सही बजावलं आहे. युजर्सच्या परवानगीविना त्यांचा डेटा उघड केल्याने फेसबुकवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर झुकेरबर्गने त्याच्या अधिकृत पेजवरुन केंब्रिज अॅनालिटिका वादावर सविस्तर भाष्य केलंय. या पोस्टमध्ये त्याने चूक झाल्याचे मान्य केलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य