Monday, 10 December 2018

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली. संतप्त विद्यार्थ्यांनी दादर - माटुंगा स्थानकादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक  ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली.

सकाळी कामावर जाण्याच्या वेळी विद्यार्थ्यांनी लोकल अडवल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या. परंतु त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला.

रेल रोको केलेल्या विद्यार्थ्यांना रूळावरून हटवण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल संतप्त विद्यार्थ्यांनीही लोकलवर दगडफेक केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य