Wednesday, 19 December 2018

देशभरात ओला-उबर चालक मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईसह पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूतील ओला, उबरचे चालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

ओला-उबर चालकांना, कंपन्यांनी मोठी आश्वासने दिली होती. म्हणून कॅब चालकांनी ओला-उबर खरेदी करण्यासाठी पाच ते सात लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. दीड लाख रुपये प्रति महिना मिळतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 75 हजाराचीही कमाई होत नसल्याने ओला-उबर चालक नाराज आहेत. कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे.

मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहिल. देशभरातील 60 हजार ओला-उबर चालक संपावर असून एकट्या मुंबईमध्ये 45 हजार कॅब आहेत, असं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य