Tuesday, 11 December 2018

मुंबईकरांना मिळणार नव्या सुविधा, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

गावठाणे, कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांना स्वतंत्र DCR तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. यावेळी मालमत्ता कर माफ करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, मुंबई महापालिकेने वैधानिक प्रस्ताव सादर केला तर, नक्कीच राज्यसरकार प्रयत्न करेल, असे आश्वसानही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. त्य़ामुळे येत्या काळात मुंबईकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळतायेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :

2018मध्ये मुंबईत 15 ठिकाणी आग लागली होती. त्यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते. भानू फरसाणच्या आगी बद्दलचा चॉकशी अहवाल तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रस्ताव तयार आहे. रेडिरेकनरनुसार त्याचा 15 ते 20 टक्के हिस्सा देण्यात येणार आहे.

आर्थर रोड जेलच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासंदर्भात कमिटी गृह विभागाने समिती नेमली आहे. त्या समितीच्या निकषांप्रमाणे त्यांचे पुनवर्सन करणार

2011 पर्यंत च्या झोपडपट्टी धारकाना संरक्षण

पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या पोलीसांना 30 वर्षे च्या नियमानुसार राहत असेल ते घर पोलिसांना देणार

2011 पर्यंतच्या झोपडपट्टींना संरक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींकडे सही साठी पाठवले आहे

मिलच्या राहणाऱ्या मिल कामगाराला 400 चौरसफुटाचे हक्काचे घर मिळणार

loading...

Top 10 News

राशी भविष्य