Tuesday, 22 January 2019

शेतकरी मोर्चाला, बॉलिवूडचा पाठिंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेच्या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. अन्नदाता म्हणून ज्या शेतकऱ्याकडे मोठ्या अदबीनं पाहिलं जातं, त्याचं शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने यावं लागलं आहे. 6 मार्चपासून नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी मुंबईत दाखल झाला. रविवारी रात्री उशिरा मोर्चेकरी आझाद मैदानावर दाखल झाले आणि सर्वत्र या अन्नदात्यांच्या एकजुटीला सलाम करण्यात आला. फक्त मुंबईकरच नव्हे तर कलाविश्वातूनही या मोर्चाला पाठिंबा देण्यात येत आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीचं प्रतिनिधित्त्व करणारा अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत या मोर्चाचं समर्थन केलं. ‘जवळपास 50 हजार शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून 180 किलोमीटरचा पायी प्रवास करुन इथे आले आहेत. या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी फक्त आणि फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये कोणतीही अडचणीची परिस्थिती उदभवू नये याची काळजी घेत रात्रीचं आपला प्रवास केला. त्यांच्या या वृत्तीला आणि भूमिकेला माझा सलाम…’, असं ट्विट करत रितेशने ‘जय किसान’ या नाऱ्याचा उल्लेखही केला.

अभिनेत्री हुमा कुरेशीनेही शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाचे समर्थन करत ट्विट केले आहे. शेतकरी मोर्चाचा फोटो शेअर करत तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘या शांततापूर्ण आंदोलनाला आपलाही पाठिंबा दर्शवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवून यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात.’ शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईत 30 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य