Monday, 19 November 2018

भाजपकडून नारायण राणे सोबत खडसेंना दिल्लीत पाठवण्याची तयारी?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाजप पक्षातून एकूण 17 खासदार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ खडसेंना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून आणि नारायण राणे यांच्यासोबत खडसेंचं नाव जोडलं जात आहे. राणेंनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली असल्याच हूी वर्तवल जात आहे.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. राज्यसभेची ऑफर राणेंनी विचार करुन स्वीकारल्याची माहिती आहे.

23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातून 10 खासदार निवृत्त होणार आहेत.

16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे.

वंदना हेमंत चव्हाण, डी. पी. त्रिपाठी - राष्ट्रवादी

रजनी पाटील - काँग्रेस

अनिल देसाई - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री  जेपी नड्डा, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, अरुण जेटली यांचा केंद्रातील कार्यकाळ संपणार आहे. तसेच राज्यसभेतून क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, रेणुका चौधरी प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, यांची निवृत्ती होणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य