Wednesday, 14 November 2018

रविवारी सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर ट्रेन्स रद्द

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे.

सिग्नल यंत्रणेतील सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळ्यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

तर काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य