Saturday, 17 November 2018

आज मनसेचा 12 वा वर्धापन दिन, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12 वा वर्धापन दिन आहे. मनसेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन कऱण्यात आल आहे.

12 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी याच दिवशी शिवतीर्थावर सभा घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली होती. रंशशारदा सभागृहात थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तब्बल 13 आमदार निवडून आणत कमाल करुन दाखवली. शिवाय नाशिक पालिकेत एकहाती सत्ता आणली. तर पुणे, मुंबई, खेडसह अनेक पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नगरसेवकही निवडून आले.

मात्र त्यानंतर राज यांच्या कार्यकिर्दीला उतरती कळा लागली आणि राज ठाकरेंचा करीष्मा हा उतरत गेला. 2014 ला आमदारांची संख्या 13 वरुन 1 वर आली. नाशिकमधली सत्ता गेली. बरेच नेते सोडून गेले. त्यामुळे आता पक्षात प्राण फुंकण्याचं नवं आव्हान एका तपानंतरही कायम आहे. नव्या जिद्दीने आता काम करत राजकारणातला आपला जोर वाढवणायचा प्रयत्नांना राज ठाकरें सुरूवात करणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य