Thursday, 17 January 2019

पुढील उपचारांसाठी मनोहर पर्रिकर यांची अमेरिकेत रवानगी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची पुढील उपचारासाठी अमेरिकेत रवानगी होण्याची बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या. स्वादूपिंडाच्या विकारामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार दाकल केलं होते. मात्र, त्यात फरक न पडल्यानं डॉक्टरांनी त्यांना अमेरिकेत पुढील उपचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काल रात्री त्यांना विमानानं अमेरिकेत हलवण्यात आलं आहे.

२२ ते २३ तासांचा प्रवास असल्यामुळं त्यांच्याबरोबर डॉक्टरांचं एक पथकही असल्याचं समजतं आहे. आपल्या गैरहजेरीत कोणतीही कामे अडू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला 50 लाखांप्रयत्न निधी खर्च करण्याची परवानगी दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पर्रिकरांना 15 फेब्रुवारीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट कार्यभार सांभाळणार. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारासाठी जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले, तर काम कोण पाहणार, असा प्रश्न होता, त्याचं उत्तर आता मिळालं आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गैरहजेरीत प्रशासकीय कामे खोळंबू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकासमंत्री फ्रांसिस डिसोझा या 3 वरिष्ठ मंत्र्यांच्या गटाकडे सर्वाधिकार सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य