Saturday, 17 November 2018

पत्नीच्या स्वभावाला कंटाळून पतिची घटस्पोटाची याचिका, उच्च न्यायालयाने फेटाळली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई उच्च न्यायालयात एक आगळा वेगळा प्रकार घडला आहे. एका नवऱ्या त्याच्या पत्नीला शुल्लक कारणावरून घटस्पोटाची याचीका दाखल केल्याच समोर आलं आहे. पत्नीला चविष्ट स्वयंपाक करता येत नाही, म्हणून तिला घटस्फोट देण्याच पतीने ठरवलं आहे. सध्या तरी न्यायालयाने त्या पतीची याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

पत्नीला स्वयंपाक येत नाही त्यात ती उशिरा उठते आणि ती कर्तव्यदक्ष नसल्याचं कारण सांगत तिच्यापासून घटस्फोट मिळावा अशी याचिका सांताक्रूझ इथे राहण्याऱ्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु हे घटस्फोटासाठीचं कारण असू शकत नाही, असं सांगत उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.

पत्नीला लवकर उठवायला गेल्यावर, ती मला आणि माझ्या पालकांना शिवीगाळ करते. ती सर्वांसाठी आणि चविष्ट असा स्वयंपाक करत नाही. कामावरुन घरी उशिरा परतल्यावर तिने साधं पाणीही विचारलं नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांने केला. मात्र, पत्नीने सर्व आरोप फेटाळले. कामाला जाण्यापूर्वी मी सर्व कुटुंबीयांसाठी स्वयंपाक करुन जात होतो, असं पत्नीने न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, स्वयंपाक न येणं ही क्रूरता नाही, त्यामुळे घटस्फोट होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच संबंधित महिला नोकरदार आहे. ती तिचा व्यवसाय करुन घराचा भार सहन करत आहे. त्यामुळे नोकरी सांभाळून ती इतर कामं करते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. असंही कोर्टाने आवर्जून नमूद केलं आहे व पतिची याचिका फेटाळली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य