Wednesday, 19 December 2018

कर न भरल्याने, सेव्हन हिल्स हॉस्पिटलला टाळे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलटचे प्रशासकीय कार्यालय महापालिकेने सील केले. सेव्हन हिल्स हॉस्पिटलटच्या व्यवस्थापनाने थकीत मालमत्ता कर न भरल्याने गुरुवारी रुग्णालयाचे प्रशासकीय कार्यालय महापालिकेने सील केले आहे

रुग्णालय व्यवस्थापनाला, थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 28 फ्रेबुवारीपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत कराची रक्कम न भरल्याने सर्व कर्मचार्यांना बाहेर काढले. आणि त्यांचे प्रशासकीय कार्यालय सील करण्यात आले.

सेव्हन हिल्स केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महापालिकेच्या रुग्णालयाची जागा देण्यात आल्यानंतर तिथे सेव्हन हिल्स रुग्णालय उभारण्यात आले.

सेव्हन हिल्स रुग्णालयाकडे एकूण 39 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकीत रक्कम आहे. त्यापैकी काही रकमेबाबत वाद असल्याने त्याची सुनावणी सुरु आहे. परंतु 9 कोटी रुपयांच्या रकमेबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नसून ही रक्कम त्यांना भरावी लागणार होती आणि ही रक्कम भरणे रुग्णालयालाही मान्य होते. मात्र वसुली करण्यासाठी वारंवार नोटीस पाठवूनही त्यांनी ही रक्कम भरली नाही. रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य