Sunday, 18 November 2018

अश्विनी बिद्रेंची हत्याच, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचं अखेर उघड झालाय. अभय कुरुंदकर याचा बालपणीचा मित्र महेश पळशीकर याने अश्विनींच्या हत्येची कबुली दिलीय. धक्कादायक म्हणजे अश्विनींची हत्या करून लाकूड कापण्याच्या मशिनने मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचं समोर आलंय.

बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आल्याचे फळशीकरने सांगितले. ज्या दिवशी अश्विनी बिंद्रे बेपत्ता झाल्या, त्या दिवसाचे कुरुंदकर याचे आणि त्यांचा कारचालक कुंदन या दोघांचे मोबाइल लोकेशन जवळ-जवळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे कुंदनवर संशय बळावला होता. त्यातच याप्रकरणात अटक करण्यात आलेला चौथा आरोपी महेश फळणीकरने आता गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांच्या तपासाला गती मिळालीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य