Tuesday, 22 January 2019

"महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू करा" - हार्दीकचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अजब सल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू कराव. असा अजब सल्ला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने दिला आहे. हार्दिक पटेल यांनी आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात याबाबतचं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या सोशल मीडियाचा प्रचार करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आपली उपस्थीती लावली होती. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना छुपा अजेंडा राबविण्याचा सल्लाही हार्दिकयांनी यावेळी दिला.

"भाजप सोशल मीडियावर आपला जोरदार प्रचार करत आहे. यात व्हॉट्सप, फेसबुक, ट्विटर अकाऊंट काढून विरोधकांना टार्गेट करतयं. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी त्यांचा शर्थीचे प्रयत्न असतात. ट्विटर, फेसबुकवरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू करा तसेचं दुसऱ्या नावाने फेसबुक, ट्विटरवरून सुरू केलेल्या या अकाउंटमधून फॉलोअर्स वाढतील. आणि त्यामुळेच काँग्रेसला आपलं टार्गेट गाठता येईल. असा दावाही त्याने केलाय. सोशल मीडियावरना महिला, युवकांच्या प्रश्नांवरना सरकारला घेरा आणि हाच प्रचार व्हायरल करन येणाऱ्या 2019 निवडणूकीचा प्रचाराच काम करा असा सल्ला हार्दिक पटेल यांनी यावेळी दिलायं.

तर दुसरीकडे, 'काँग्रेसला हार्दिक पटेल सारख्या बाहेरच्या नेत्यांला बोलवावे लागते त्यामुळे काँग्रेससाठी किती दुर्दैव आहे हे स्पष्ट होत. आणि याअगोदर राहुल गांधी याची सोशल मीडियावर ची फेक अकाऊंट उघड झालीं आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सोशल मीडियावर फेक काम करत. त्यामुळे जनतेने च ठरवाव काय करायचं'. असं आशिष शेलारयांनी म्हटलय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य