Sunday, 18 November 2018

'तो' व्हिडिओ शेअर करुन कपिल सापडला अडचणीत

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

'फिरंगी' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. पण या आनंदात एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कपिल शर्माने बाईक चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केलाय. मात्र, या व्हिडिओमुळे कपिल चांगलाच अडचणीत सापडला आहे. कपिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो अमृतसरच्या रस्त्यावरुन बुलेट राईड करताना दिसतोय. 

या व्हिडिओच्या विरोधात एका विद्यार्थी संघटनेनं तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष केशव कोहली याने कपिल शर्मा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनुसार कपिल हा एक युथ आयकॉन आणि अनेकांचा रोल मॉडेल आहे. इतरांप्रमाणे त्याने वाहतूक नियमांचे पालन करायला हवं आहे. मात्र, कपिलने हेल्मेट परिधान न करताच बाईक चालवली, असे कोहली यांनी म्हटले आहे. दरम्यान, वाहतूक उल्लंघन केल्याप्रकरणी कपिल शर्मा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.    

loading...

Top 10 News

राशी भविष्य