Wednesday, 16 January 2019

फेसबुकबाबत धक्कादायक माहिती उघड; कोटींच्या घरात फेक अकाऊंट्स

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

फेसबुक या सोशल मीडियाची जगभरात सुमारे 20 कोटी खाती एकतर बनावट किंवा नकली आहेत, असे फेसबुकनेच जाहीर केले आहे. बोगस खात्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे फेसबुकच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. 'जगभरातील आमच्या मासिक सक्रिय यूजर्सपैकी सुमारे 10 टक्के खाती बनावट असल्याचे सन 2017च्या चौथ्या तिमाहीअंती आढळले', असे फेसबुकने आपल्या वार्षिक अहवालामध्ये नमूद केले आहे.

विकसित बाजारपेठा असलेल्या देशांच्या तुलनेत विकसनशील बाजारपेठा असलेल्या भारत, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आदी देशांमधील बनावट फेसबुक खात्यांचे प्रमाण खूपच जास्त असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. बनावट किंवा नकली खात्यांची संख्या हा केवळ एक अंदाज असतो, कारण अचूक आकडा कळणे कठीण असते. असे देखील या अहवालात म्हटले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य