Thursday, 17 January 2019

अनिकेत कोथळे खुनाचा खटला आता फासट्रॅक कोर्टात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सांगली पोलीस कोठडीतील मारहाणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आलेल्या अनिकेत कोथळेच्या खुनाचे 700 पाणी चार्जशीट सोमवारी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली.

वरिष्ठ सीआयडी अधिकाऱ्यांनी आज जिल्हा न्यायालयात 700 पाणी चार्जशीट दाखल करण्यात आली. 6 नोव्हेंबर रोजी अनिकेतचा आणि त्याच्या मित्रांचा आगदी शूल्लक कारणावरून खून करण्यात आला होता.

याप्रकरणी बडतर्फ पीएसआय कामटेसह 7 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी 12 वाजता सीआयडी अधिकारी आणि पोलिसांनी 700 पाणी चार्जशीट न्यायालयात दाखल केले.

या प्रकरणात एकूण सात आरोपी असून 125 जणांची चौकशी करण्यात आली. यातील आणखी दोन आरोपींचा तपास सुरू असून सीआयडीचे पोलीस निरीक्षक  हरीश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने अनिकेत कोथळेच्या खुनाचे आरोपपत्र अखेर न्यायालयात दाखल केले आहे.

या प्रकरणात सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली, तर कोथळे खुनाचा खटला हा आता फासट्रॅक कोर्टात चालणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य