Friday, 18 January 2019

मागवला आयफोन मिळाला साबण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

सध्या ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ खूप वाढली आहे. मोठ्या संखेने लोक ऑनलाईन शॉपिंग करतात.  ऑनलाईन शॉपिंगचा फायदा खूप होतो. पण, त्याचबरोबर ऑनलाईन शॉपिंगचे काही तोटेदेखील आहेत.  ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर आपण जे मागवतो तेच डिलिह्वर होणार अशी आपण अपेक्षा करतो. पण, कित्येकदा असे होत नाही.

आपण मागवतो एक आणि डिलिह्वर होते भलतेच काहीतरी. या ऑनलाईन शॉपिंगचा एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला चांगलाच फटका बसला आहे. तरबेज मेहबूब नगराली असे या तरुणाचे नाव आहे. तरबेजने फ्लिपकार्डच्या साईटवरून आयफोन-8 बुक केला होता. त्यावरील 55 हजारांचे पेमेंटही त्याने केले होते. मात्र, त्याला डिलिवरीत आयफोन न मिळता साबण मिळाला आहे.

detergent-bar.jpg

या घटनेनंतर त्याने फ्लिपकार्डवर विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. तरबेजच्या म्हणण्यानुसार 22 जानेवारीला पनवेलच्या घरी पार्सलद्वारे  त्याला आयफोनच्या ऐवजी साबण मिळाला आहे. यावर पोलिसांनी फ्लिपकार्ड विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. असे फ्लिपकार्डकडून सांगण्यात आले आहे.      

loading...

Top 10 News

राशी भविष्य