Friday, 18 January 2019

ठाणे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, महिलेचा पाय गटारावरील लोखंडी जाळीत अडकला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ठाणे शहरातील फूटपाथ- नाल्यावर लावलेल्या लोखंडी आणि जाळ्याच्या चेंबरची दूरवस्था झाली असून त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. असच काहीस उदाहरण ठाण्यातील रोडवरून समोर आले आहे.
ठाण्यातील राममारुती रोडवरील एक धक्कादायक घटना घडली आहे. रोडवरून चालत असताना एका महिलेचा पाय गटारावरील लोखंडी जाळीत अडकल्याची घटना ठाण्यात घडली आहे. जयश्री मधुकर रेमाडे असं या 54 वर्षीय महिलेचं नाव आहे.

बराच प्रयत्न करुनही जाळीतून पाय काढण्यात यश आलं नसल्याने शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. शेवटी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने तब्बल तासाभरानंतर जयश्री रेमाडेंचा पाय जाळीतून यशस्वीपणे सोडवला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. चेंबरची झाकणं बदला असा नागरिकांचा आक्रोश असतानाही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी संध्याकाळी ठाण्यातील राममारुती रोडवरून पायी जाणाऱ्या 54 वर्षीय जयश्री मधुकर रेमाडे यांचा पाय चेंबरच्या लोखंडी जाळीत अडकला.

रेमाडे यांचा गुडघ्यापर्यंत पाय अडकल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर वाहतूक ठप्प झाली व एकच गर्दी तेथे निर्माण झाली. अखेर पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने महिलेची सुटका केली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नागरीकांकडून रस्त्यावरील चेंबरची झाकणं कमकुवत झाल्याचं आणि ती बदलण्याची मागणी तसंच तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, गटारांची झाकणं बदलली नाहीत. याआधीही काही दिवसांपूर्वी एका मुलीचा पायही अडकल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, पालिका प्रशासनाचे यावर लक्ष नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य