Tuesday, 20 November 2018

आदित्य ठाकरेंची नेतेपदी वर्णी - गुलाबराव पाटील यांनी केली घोषणा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. या अनुषंगाने शिवसेनेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी पार पाडली.

दरम्यान, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना बढती देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी वर्णी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर, मनोहर जोशी, सधीर जोशी यांचही नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदेंना नेतेपद देण्यात अलेले नाही.  

शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी यांच्यासारखे ज्य़ेष्ठ नेते आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करतील. 

2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहरचना निश्चित केली जाईल. एकहाती सत्ता हे आगामी काळात शिवसेनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य