Friday, 18 January 2019

‘मांसाहारी जेवणासाठी प्लास्टिक प्लेट्स वापरा’; आयआयटीच्या विद्यार्थ्यांना वादग्रस्त ई-मेल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तंत्रज्ञानातील कौशल्ये, नवनवीन संशोधन, स्टार्ट अप अशा गोष्टींसाठी ओळखल्या जाणा-या आयआयटीत मुंबईमध्ये सध्या नवा वाद पाहायला मिळतोय. वसतिगृहामधील मांसाहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खानावळीतील स्टीलचे ताट वापरू नये, त्याऐवजी मांसाहारी जेवणासोबत मिळणाऱ्या प्लास्टिक प्लेट्सचा वापर करावा, असा वादग्रस्त ई-मेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे.

मात्र, हा ई-मेल आयआयटी प्रशासनाने नव्हे तर स्टुडंट कौन्सिलने पाठवल्‍याचे संस्थेचे म्हणणे आहे. दरम्यान, आयआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खानावळीचे शुल्कही घेतले जाते. मात्र, यात केवळ शाकाहारी जेवणाची सोय असते. मांसाहारी जेवण हवे असल्यास त्यांना अतिरक्त पैसे मोजावे लागतात. वसतिगृह क्रमांक 11 मधील विद्यार्थ्यांनाच हा ई-मेल पाठवण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य