Monday, 10 December 2018

अन् पिठात अळ्या सापडल्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सुपरमार्केटमधून आणलेल्या सर्वच वस्तू या चांगल्या दर्जाच्या असतात असे आपण मानतो. पण, काही वेळा यामध्ये काही त्रुटी आढळतात. या गोष्टी क्वचितच आपल्या नजरेत येतात. नाहीतर त्या आपल्याला कळतही नाहीत. अशाच प्रकाची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरमध्य़े सुपर मार्केटमधून घेतलेल्या पिठात अळ्या आढळल्याची बातमी समोर आली आहे.

या प्रकारानंतर ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. उल्हासनगरच्या कॅम्प 2 भागात पटेल आर मार्ट सुपरमार्केटची शाखा आहे. येथून एका ग्राहकाने पीठ विकत घेतले होते. मात्र, पीठ उघडल्यानंतर त्यात मोठमोठ्या जिवंत अळ्या आढळून आल्या. संतप्त ग्राहकाने दुकानात जाऊन उत्कृष्ट दर्जाच्या मालाचा जाब विचारला असता मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरं दिली.

त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने याबाबत अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अन्न-औषध प्रशासनाने दुकानात जाऊन तपासणीसाठी पिठाचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य