जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
हो.. नाही... म्हणता म्हणता अखेरीस नारायण राणे आज भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडणाऱ्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचा आज अखेरचा दिवस आहे. आणि नेमकी हिच संधी साधत राणे पिता-पूत्रांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं.
काँग्रेस पक्षावर राणे सध्या नाराज आहेत. त्यातच त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. राणे यांनी शहा यांच्याबरोबर झालेल्या भेटीचा इन्कार केला असला तरी राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राणेंवरून काँग्रेस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर नारायण राणे यांच्या भूमिकेवर सिंधुदुर्गच्या राजकारणातील उलथापालथ अवलंबून आहे. याआधीही नारायण राणेंनी अनेकदा उघड उघड नाराजी व्यक्त केली होती.