Sunday, 18 November 2018

जीव घेईल नशा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मद्यपी वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर भूमिका घेतलीय. मद्यपी वाहनचालकामुळे अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित वाहनचालकाला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या कायद्यानुसार मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू  झाल्यास चालकाविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम 304 अ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यानुसार त्या वाहनचालकाला दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. यात आता सुधारणा केली जाणारंय.

मद्यपी वाहनचालकाला सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. प्रत्येक वाहनाला थर्ड पार्टी विमा बंधनकारक केले जाणार आहे. थर्ड पार्टी विमा नसल्यास अपघातग्रस्तांना भरपाई मिळत नाही. यामुळे ही शिफारस करण्यात आलीय.

येत्या नाताळ किंवा  31 डिसेंबरनिमित्त लोकं अनेकदा सहलींसाठी बाहेर जातात. त्यानंतर सेलिब्रेशनच्या नावाखाली नशेत बेभान होतात आणि त्याच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचा धोका पत्करतात आणि होतात भयंकर अपघात.

पण यावर्षीपासून ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह संदर्भातले कायदे अधिकच कडक करण्यात आलेयंत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य