Thursday, 17 January 2019

रायगडाची शान राखाचं!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. त्यातही रायगडाला एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळंच राज्य शासनानं रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेतलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात रायगड प्राधिकरणाची घोषणा केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आलीय.

तर, रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण आयुक्त जगदीश पाटील, पर्यावरण व सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव नितीन गद्रे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एएसआय रिजनल जनरल डॉ. एम. नंबीराजन, डायरेक्टर जनरल डॉ. उषा शर्मा, एमटीडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय वाघमारे, रायगड जि. प. सीईओ अभय यावलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, रघूजी आंग्रे, इतिहास अभ्यासक राम यादव, सुधीर थोरात यांचा या प्राधिकरणात समावेश आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य