Tuesday, 13 November 2018

शिवसेनेने जुने संबंध जपले; भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला देणार बिनशर्त पाठिंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 21 ची पोटनिवडणूक लढली जाणार आहे.

मुंबई भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी प्रतिभा योगेश गिरकर यांना उमेदवारी दिलीये. तर,  तिथेच भाजप आमदार भाई गिरकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलीये.

गिरकर कुटुंबियांसोबत जुने संबंध असल्यानं शिवसेनेकडून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला जाणार नाही अशी माहिती मिळत आहे.

सध्या शिवसेना आणि भाजपमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. परंतु पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही पक्षात दिलजमाई झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 20च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. याआधी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं अनेक मुद्द्यांवर भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य