Tuesday, 13 November 2018

आमच्या बहिणीला पाठिंबा देण्याच्या बदल्यात 15 कोटी घेतले; धनंजय मुंडेंचा सुरेश धसांवर खळबळजनक आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुरेश धस यांनी पंधरा कोटी रुपये घेऊन आपले पाच सदस्य पालकमंत्री यांना विकले आणि ते आम्हाला शहाणपण शिकवीतायेत असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलाय.

राष्ट्रवादीने धस यांना सगळं दिलं मात्र त्यांनी धोका दिला,आता त्यांना कायमच घरी बसवा असेही धनंजय मुंडे म्हणालेत.

स्व.पंडित अण्णा व नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या पोटात शिरून त्यांनी नंतर त्यांनाच धोका दिला. आष्टीची शिवसेनेची जागा भाजपला सोडवून घेतली. पवारांनी यांना मंत्रिपद दिले. पण त्यांच्यासोबतही दगाफटका केला. जिल्हा परिषदेत भाजपला साथ देऊ नका असे अजित  पवार यांनी त्यांना सांगितले होते, पण मी तुमच्यासाठीच हे करतोय असे ते सांगत. आमच्या बहिणीला जिल्हा परिषदेत पाठिंबा देण्याच्या बदल्यात 15 कोटी घेतल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या गड्याला दयामाया नाही. भाजपमध्ये राणेंचा नंबर लागेना; ये किस झाड की पत्ती असा टोलाही त्यांनी लगावला.

दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे आरोप फेटाळलेयेत. प्रत्येक प्रकरणात तोडपाणी करणाऱ्या धनंजय मुंडेंना काविळ झाल्यामुळे सर्व जगच पिवळे दिसतंय असा टोला लगावला.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य