Saturday, 18 November 2017

मंत्रीमंडळ प्रवेशासाठी नारायण राणेंना करावी लागणार आणखी प्रतिक्षा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. आता हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचंही भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरल्याचं समजतयं.

नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री विनय कोरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

कोकणात काहीशी कमकुवत असलेल्या भाजपाची नारायण राणेंच्या माध्यमातून घट्ट पाय रोवण्याची रणनीती आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News