Tuesday, 22 January 2019

आवक वाढल्याने सिताफळच्या दरात घसरण, ऐन दिवाळीत उत्पादक शेतकर्‍याचे निघणार दिवाळे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

नवी मुंबईतील तुर्भेस्थित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सिताफळाची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे सिताफळ उत्पादक शेतकर्‍यांचे यंदा ऐन दिवाळीत घसरलेल्या बाजारभावामुळे दिवाळे निघण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी बाजारात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ४० हजारांपेक्षा अधिक कॅरेटमधून सिताफळाची आवक झाली आहे. पुणे, सासवड, बारामती, सोलापुर, बीड, जालना, पंढरपुर, नगर, शिरूर, नाशिक, जुन्नर यांसारख्या भागातून सिताफळे विक्रीला आली आहेत.

१२ ते २० किलो वजनाचे एक कॅरेट असते. १० रूपयांपासून ७० रूपये किलो या दराने सिताफळाची विक्री होत आहे. ही परिस्थिती अशीच सुरु राहिल्यास सिताफळ उत्पादक शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. बाजारभाव घसरल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याची शेतकर्‍यांना भीती आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य