Wednesday, 16 January 2019

15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा आम्ही हटवू : राज ठाकरे

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच मनसेने आज मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं आहे.

'मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेरच्या सर्व फेरीवाल्यांना रेल्वेनं १५ दिवसांत हटवावं. रेल्वे प्रशासनानं तसं न केल्यास सोळाव्या दिवशी मनसेचे कार्यकर्ते या फेरीवाल्यांना तिथून हाकलतील. त्यावेळी जो संघर्ष होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वेची असेल,' असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. 'आजचा मोर्चा आम्ही शांततेत काढला. पण यापुढंही परिस्थिती हीच राहिली तर आम्ही शांत राहणार नाही', असंही त्यांनी ठणकावलं.

लोकल सेवेच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करताना राज यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनलाही जोरदार विरोध दर्शवला. बुलेट ट्रेनला पहिला विरोध मी केला होता. बुलेट ट्रेनमागे मुंबई बळकावण्याचा हेतू आहे. मला पहिल्या दिवशीच त्यांचा हेतू कळला. गुजरातचा डोळा मुंबईवर आहे. त्यांच्यासाठी हा बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे,' असा थेट आरोप राज यांनी केला. 'गुजरातच्या भल्यासाठी हे कर्ज काढणार आणि नंतर सगळा देश हे कर्ज फेडणार, असं सांगतानाच, 'कुणासाठी आहे ही बुलेट ट्रेन, असा सवाल त्यांनी केला. 'बुलेट ट्रेनला विरोध केल्यामुळं सुरेश प्रभू यांना मंत्रिपदावरून काढून टाकल्याचा आरोप करतानाच, पीयूष गोयल यांना रेल्वेच्या समस्यांमधलं काय कळतं,' अशी विचारणाही त्यांनी केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य