Saturday, 17 November 2018

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही...राज ठाकरेंचे मोदींना आव्हान..

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

  

शहरातील रेल्वे स्थानकांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकही विट रचू देणार नाही अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

 

बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते मोदींनी आपल्या गुजरातमध्ये करावे. मात्र, मुंबईत बळजबरीने बुलेट ट्रेनचे काम करायचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे सांगत राज यांनी थेट मोदींना आव्हान दिले.

 

रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकारवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. काँग्रेस जाऊन भाजपचे सरकार आले तरी यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. तसेच 5 ऑक्टोबरला पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयावर ‘मनसे’कडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

 

 

पाहुयात काय म्हणाले राज ठाकरे :

 

मी मुद्दाम घटनास्थळी गेलो नाही,  माझ्यामुळे यंत्रणांवर ताण येऊ द्यायचा नव्हता.

प्रशासनातील प्रत्येकजण आपापली जबाबदारी झटकतायेत, पुलाबाबत कुणीही गांभीर्य दाखवलं नाही.

शहरातल्या पायाभूत सुविधा कोसळ्यायेत. परप्रांतीय लांढे आदळायचे थांबत नाही तोपर्यंत हे सर्व थांबणार नाही.

ठाणे, पुणे यांसारखी इतर सर्व शहरं आचके देत आहेत. अशा घटना दिवसेंदिवस वाढत जाणार.

लोकांना जगणं मुश्किल, बुलेट ट्रेन कशाला, मेट्रोनं मुंबईची वाट लावली.

रेल्वे स्टेशनची नावं बदलून परिस्थिती बदलते का?.

सर्वसामांन्यांच्या गरजा सरकारनं समजून घ्याव्यात.

हे मुंबईकरांचे स्पिरीट नव्हे तर जगण्याची धडपड आहे.

सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला आहे.

देशाला दुशमनाची गरज कशाला.

5 तारखेला चर्चगेटवर मोर्चा, मुबईकरांनो सहभागी होऊन राग व्यक्त करा.

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही.

5 तारखेला चर्चगेटवर मोर्चा, मुंबईकरांनो सहभागी होऊन राग व्यक्त करा.

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य