Sunday, 18 November 2018

एल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीत ‘त्या’ दोघींच्या अतूट मैत्रीचा अंत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या घटनेत मीना वारूजकर आणि श्रद्धा वरपे या दोन मैत्रीणींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या दोघी एकाच ऑफीसमध्ये काम करत होत्या.  

38 वर्षीय मीना ही कुटुंबामधली एकमेव कर्ती स्त्री होती .ती एल्फिस्टन इथल्या कामगार मंडळ कार्यालयात कमाला होती. तिच्या मृत्यूने घरं पोरक झाल्याची भावना कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.

आता कोणावर अवलंबून राहायचं असा प्रश्न मीनाच्या कुटुंबियांनी केलाय.आम्हाला बुलेट ट्रेन नको पण रेल्वेनं योग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केलीय.

तर, कल्याण पूर्व इथल्या खडेगोळवली परिसरातील श्रद्धा वरपे आपल्या आई वडील आणि दोन भवांसह राहत होती.

श्रद्धा ही एल्फिस्टन इथल्या कामगार मंडळ कार्यालयात कमाला होती..तिचे वडील किशोर वरपे सुद्धा याच ऑफिसमध्ये कामाला आहेत..त्यांची ड्युटी आधीची असते.

नेहमीप्रमाणे श्रद्धा ही ऑफिसला जाण्यासाठी पुलावरून येत असताना दुर्दैवी घटना घडली आणि जीव गमवाला.

तिच्या आशा हृदयद्रावक मृत्यूनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय..

loading...

Top 10 News

राशी भविष्य