Sunday, 18 November 2018

#रेल्वेचंहत्याकांड - मुंबईच्या एलफिन्स्टन स्थानकावर चेंगराचेंगरीत 23 जण ठार तर 36 प्रवासी जखमी

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या एलफिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी सकाळी फुट ओवर ब्रीजवर प्रवाशंची प्रचंड गर्दी झाल्याने पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेगरीत 23 जण ठार तर 36 प्रवासी जखमी झाले आहेत. 

 

अचानक आलेल्या पावसात वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने तेथील वातावरण अस्थाव्यस्थ झाले होते. यामुळे प्रवाशांची धावपळ झाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे समजते. 

 

या गोंधळानंतर पुलावर शॉर्टसर्किट झाल्याचे समजताच प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आणि प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या चेंगराचेंगरीत प्रवाशांचे नाहक बळी गेले आहेत. यामध्ये 23 प्रवाशांचा मृत्यू तर, 36 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

जखमींना उपचारासाठी  Aनिगेटिव्ह,  Bनिगेटिव्ह, ABनिगेटिव्ह या रक्त पुरवठ्याची गरज आहे. इच्छुक रक्तदात्यांनी केईएम रुग्णालयातील -24136051  या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा असे अावाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

 

मुंबई लोकलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे. घटनेनंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केईएम रुग्णालयाकडे घाव घेतली.

 

या रेल्वे हत्याकांडला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत केली जाईल. तर, जखमींचा खर्च सरकार करणार अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.   

loading...

Top 10 News

राशी भविष्य