Thursday, 15 November 2018

सचिन तेंडुलकर, आदित्य ठाकरे यांची स्वच्छता मोहिम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 सप्टेंबरला आपल्या वाढदिवशी, देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याच स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद देत क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या संचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुनसह, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरें यांच्यासह या अभियानात सहभागी होऊन पुढाकार दर्शविला.

 

मंगळवारी पहाटे 5 वाजता हातात झाडू घेऊन वांद्रे पश्चिम येथील बँड स्टँड परिसरात स्वच्छता केली.

 

मोदींनी देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पत्र लिहून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सचिन तेंडुलकरने मंगळवारी या अभियानात हजेरी लावली.

 

प्रत्येक नागरिकाने आपला देश हा आपले घर समजून स्वच्छ करावा, असे आवाहनही राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केले आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य